Top News देश

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

चेन्नई | तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांंधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर चौफेर टीका केली आहे.

‘निकरवाले’ तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत. तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील त्यांच्या मदतीला मी आलो आहे, असं म्हणत राहुल गांधींनी आरएसएसवर निशाणा साधला आहे.

तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल, अशा शब्दात गांधींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातवर टीका केली.

दरम्यान, मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी, असंही गांधी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हत पाहिजे- संजय राऊत

“ज्यांच्याबरोबर लढायचं त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची”

बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या