बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना म्हणजे काय?, राहुल गांधींच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, फटे लेकीन…

मुंबई | शिवसेना आणि भाजपच्या 25 वर्षाच्या युतीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेनं बाहेरचा रस्ता पकडला. शिवसेनेनं आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाऊन महाविकास आघाडीचा रस्ता पकडत राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची संसदेत चांगलीच जवळीक होताना दिसत आहे. राहुल गांधी यांची राऊतांनी काही दिवसांपुर्वी भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

राहुल गांधी यांनी शिवसेना म्हणजे काय?, असं विचारलं असता आपण त्यांना सांगितलं की, शिवसेना म्हणजे आम्ही रस्त्यावर उतरलो की, आम्ही मागचा पुढचा विचार करत नाही. फटे लेकीन हटे नही, असं आमचं असतं. आम्ही कोणाच्या पाठीत वार करत नाही, असं संजय राऊत यांनी राहुल गांधीना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

शिवसेना इथपर्यंत अनेक वार आणि घाव सहन करत आली आहे. तसेच, शिवसेना ही त्यागातून आणि संघर्षातून समोर आली आहे. जे आंदोलनं शिवसेनेनं केलेली आहेत, त्याच आंदोलनाच्या पुण्याईवर आम्ही उभे आहोत, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात राहुल गांधींनी विरोधकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर 2 ऑगस्टला गांधी आणि राऊत यांची भेट झाली असं वृत्त आलं होतंं. त्यानंतर राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

थोडक्यात बातम्या –

“शिवसेनेला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”

मुंबईचा जगभरात डंका! प्रामाणिकपणाच्या सर्वेक्षणात पटकावला दुसरा क्रमांक

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस; ‘या’ प्रकरणामुळे रहावं लागणार हजर

‘या’ कंपनीला आले सोन्याचे दिवस, एका दिवसात विकल्या इतक्या कोटींच्या स्कूटर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More