देश

मोदींविरोधात लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही- राहुल गांधी

भुवनेश्वर | मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार पण त्यांचा द्वेष करणार नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. भुवनेश्वर येथिल ‘द ओडिसा डायलॉग’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदी आणि मी एकमेकांशी सहमत नाही. मी त्यांच्याशी लढेल, ते पंतप्रधान होऊ नये यासाठी प्रयत्न करेल पण त्यांचा तिरस्कार करणार नाही, असं राहुल गांधीनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 

मोदी जेव्हा मला अपशब्द वारतात तेव्हा मी त्यांना मिठी मारल्यासारख वाटतं, मला त्यांचा राग येत नाही हीच आमची घडण आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप आणि त्याचा वैचारीक पालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेले अपशब्द हे मी सर्वात मोठी भेटवस्तू समजतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं

न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-

-प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

-“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

-काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या