राहुल गांधींचा ट्वीट करत गंभीर दावा; देशभर एकच खळबळ

Rahul Gandhi | कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत गंभीर दावा केला आहे. यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी संसदेमध्ये आपण केलेले भाषण दोघांमधील एकाला आवडले नाही, त्यामुळे लवकरच आपल्यावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईची शक्यता असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्वीट करत याबाबत जाहीर दावा केला आहे.  सध्या देशभर या (Rahul Gandhi) ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. 29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले होते. यावेळी त्यांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली होती. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.

राहुल गांधी यांचं ट्वीट काय?

राहुल गांधी यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) म्हटले की, “दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नाही. ईडीमधील आतील गटाने मला सांगितले की, तुमच्यावर छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे. ईडीची वाट पाहत आहे. चहा आणि बिस्कीटे माझ्याकडून”

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना महाभारत युद्धाच्या चक्रव्यूहचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. महाभारतातील युद्धात सहा जणांनी अभिमन्यूला मारले.(Rahul Gandhi) आता नवे चक्रव्यूह तयार केले जात आहे. तेही चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे होते. त्या कमळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर घेऊन फिरतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधी यांचं संसदेतील भाषण काय होतं?

महाभारतमध्ये अभिमन्यूला द्रोण, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी या सहा जणांनी मारले. आजच्या युगातही असे 6 जण आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हेच 6 जण सगळं काही कंट्रोल करत असल्याचे (Rahul Gandhi)राहुल गांधी म्हणाले होते.

संसदेत राहुल गांधी यांच्या या विधानावरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले होते. सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नये, असं ते म्हणाले होते. त्यावर राहुल गांधी म्हणाले की अजित डोवाल, अदानी आणि अंबानी यांची नावे घ्यायची नसतील तर घेणार नाही.

News Title : Rahul Gandhi sensational tweet

महत्त्वाच्या बातम्या-

“नकार देऊन सुद्धा मला मित्रासोबत झोपायला…”, करिश्माच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं

नवरा सिगरेट ओढत असेल तर आत्ताच व्हा सावध, धक्कादायक माहिती आली समोर

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..

“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक