मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळा भेट घेतली त्यात काय चुकलं?, मोदी परदेशात अनेकांच्या गळाभेट घेतात, असं राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी म्हटलं. ते मुंबईत बोलत होते.
राहुल गांधींनी बाकावर बसून जे केलं म्हणजे डोळा मारला, ते करायला नको होतं. तिथं थोडी गडबड झाली. त्यामुळे त्यांच्यात गांभीर्य नसल्याची टीका सगळीकडून होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी संसदेत कामकाज सुरू असताना आपल्या सहकाऱ्याला पाहून डोळा मारला होता. तो व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुंबईला इंडियन्सला मोठा धक्का, या खेळाडूवर टी-20 खेळण्यास बंदी
-कोहली आणि धोनीचा हा खास फलंदाज पुनरागमनासाठी सज्ज
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल