देश

आम्ही या गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

पाटणा | खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही. आम्हाला ती गोष्ट जमत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी राहुल गांधी यांनी वाल्मिकीनगर येथे सभा घेतली. यावेळी राहुल गांधी बोलत होते.

काँग्रेसला अशाप्रकारे खोटे बोलायला जमत नाही. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या पाठिशी कसे उभे राहायचे, रोजगारनिर्मिती कशी करायची किंवा देश कसा चालवायचा हे काँग्रेसला ठाऊक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी 

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार 

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार 

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच रामदासा…’; आठवलेंना गृहमंत्र्यांकडून ‘आठवले पॅर्टन’ सदिच्छा 

राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या