देश

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

नवी दिल्ली | कृषी विधेयकांवरून राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल”

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

कोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या