बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केलाय. यात लसीकरणाविषयीची आकडेवारी देण्यात आली आहे. तसेच कोरोना लसी कुठं आहेत, असा सवालही राहुल गांधींनी केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना विरोधी लसीकरणाचे 2 डोस देणं आवश्यक आहे. याप्रमाणे दररोज किमान 88 लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील 7 दिवसात दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाच लसीकरण दिलं जातंय. दुसरीकडे मागील 7 दिवसात दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी याआधी देखील वारंवार कोरोना लसींच्या तुटवड्यावरुन मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जुलै महिना आला, पण लस आली नसल्याचं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

चिंता वाढली! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 

शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर; पुन्हा युती होणार?, नितेश राणे म्हणतात…

17 लाखाच्या चोरीचा बनाव; घडलेला प्रकार पाहून पोलिसांनीही टेकले हात!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More