बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर टीका करताना दिसतात. लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज पुन्हा राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

कोरोना रुग्णांचे मृतदेह हे गंगा नदीमध्ये वाहत असलेले आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. राहुल यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेने बोलवलं असं म्हटलं होतं. यावरून आता सध्या परिस्थितीचं उदाहरण देत काँग्रेसने टोला लगावला आहे

दरम्यान, काही दिवसांपुर्वी बिहारच्या नद्यांमध्ये कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह तरंगताना सापडले होते. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. उत्तरप्रदेश आणि बिहार सरकार रूग्णांचे आकडे लपवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर राज्यात कोरोना स्थिती आणखी गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र, म्हणाले ‘ये पब्लिक है ना’

ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू

‘माझ्या प्रश्नाचं किंबहुना उत्तर देणार का?’; गोपिचंद पडळकर यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ 22 उमेदवारांना बार्टीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण!

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More