Rahul Gandhi | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉँग्रेस नेते राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षातील खासदार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत एक विधान केलं. यामुळे संसदेत बराच गदारोळ झाला. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहुन राहूल गांधींचा विरोध केला.
पावसाळी अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भाषण केलं. या दरम्यान त्यांनी हिंदुंबाबत मोठं विधान केलं. सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजप हिंसा पसरवत आहे, असं राहुल गांधी (Rahul Gandhi ) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा इतर खासदारांकडून जोरदार निषेध करण्यात आला.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“मोदीजींनी एका दिवशी आपल्या भाषणात सांगितले होते की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. याचं कारण म्हणजे भारत हा अहिंसाचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी देखील म्हटलंय की घाबरू नका. महादेव म्हणतात की, घाबरू नका आणि घाबरवू नका. त्यांच्या डाव्या हातातील त्रिशूल हे अहिंसेचं प्रतिक आहे. हिंदू धर्मात लिहिले आहे की, नेहमी सत्यासोबत उभे राहिले पाहिजे.”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
“काही लोक स्वतःला हिंदू म्हणतात आणि 24 तास फक्त हिंसा-हिंसा.. नफरत-नफरत.. करतात. असे लोक हिंदू राहुच शकत नाहीत. कारण, हिंदू धर्मात सत्याची बाजू घ्यावी, असं सांगण्यात आलंय.”, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi ) म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी केला राहुल गांधींचा निषेध
तसंच पुढे त्यांनी सरकारच्या आदेशावरून माझ्यावर हल्ले केले गेले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. भगवान शंकराचं चित्र दाखवणं चुकीचं आहे का? संविधानाचं चित्र दाखवणे गुन्हा आहे का? असं म्हणत जय महादेव…, अशी घोषणा देखील राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावर संसदेत गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभं राहत या वक्तव्याचा निषेध केला. सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. राहुल गांधी यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह असून त्यांनी देशाची माफी मागावी, असं अमित शाह म्हणाले.
News Title – Rahul Gandhi Statement on Hindu in Parliament
महत्वाच्या बातम्या-
शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर!
लग्न केलं एकासोबत आणि रहायचंय बॉयफ्रेंडसोबत, विवाहीत महिलेची अजबच मागणी
“तुला बायको ना मुलगी, ना संसार,भटका माणूस..”; संभाजी भिडेंचा कुणी घेतला समाचार?
तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल
“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समझने वाले को इशारा काफी”