Top News देश

काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंबरोबरच… काँग्रेस सरकारबाहेर पडणार म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी सुनावलं

नवी दिल्ली |    महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्थिर आहे, अशा चर्चा सध्या रंगत होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. अशातच राहुल गांधींच्याच एका वक्तव्यामुळे काँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर खुद्द राहुल गांधी यांनीच आता स्पष्टीकरण दिलं आहे.

राहुल गांधी फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट करत, मी काय म्हणालोय हे एकदा व्हीडिओमध्ये जाऊन नक्की पाहा. पेड मिडिया अशा प्रकारच्या विनातथ्य चर्चा करत आहे. ज्यावर चर्चा व्हायला हवी त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला नको म्हणून लक्ष भरकटवण्यासाठी अशा चर्चा सुरू असल्याचं परखड मत राहुल गांधी व्यक्त केलं आहे.

राहुल गांधी यांनी मंगळवारी रात्री फेबसुकवर उशिरा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस ठाकरे सरकारमध्येच राहणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे विविध चर्चानंतर ठाकरे सरकार स्थिर आहे, असं म्हणावं लागेल.

दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत आहे परंतू निर्णय़ घेण्याचे अधिकार काँग्रेसला नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काँग्रेस राहुल गांधींच्या विरोधात जाऊन सत्तेत सहभागी झाली आहे का? मग राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

महत्वाच्या बातम्या-

लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

“जबाबदारीपासून पळ काढणे ही राहुल गांधी यांची जुनीच सवय”

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या