Top News

राहुल गांधींच्या वक्तव्याने शिवसेना-काँग्रेसच्या नात्यात मिठाचा खडा

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात केलेलं ट्विट फारच बोलकं असून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव आंदोलना’चं आयोजन केलं होतं. यावेळी माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संसदेत केलेल्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याप्रकरणी भाजपकडून माफी मागण्याची होत असलेली मागणी त्यांच्या या वक्तव्याच्या मुळाशी आहे.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. आम्ही जसा नेहरु आणि गांधींचा सन्मान करतो तसाच तो तुम्ही सावरकरांचा करावा, याच्याशी कुठलीही तडजोड नाही, असा स्पष्ट इशारा राऊत यांनी काँग्रेसला दिला.

तडजोड नाही, या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ आता वेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ लागला आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे सावरकर वादाचा मुद्दा वाढला तर ही आघाडीसुद्धा तुटू शकते, असं मानलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या