देश

अर्थमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेसच्या राहुल गांधींची जोरदार टीका

Loading...

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देत टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा केली, त्यानंतर राहुल गांधीनी ट्वीट करत ही टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी या निर्णयाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाशी जोडला आहे. कोणताही मोठा कार्यक्रम किंवा निर्णय भारताची आर्थिक परिस्थिती लपवू शकत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

Loading...

#HowdyIndianEconomy दरम्यान खाली जात असलेल्या शेअर बाजारासाठी नरेंद्र मोदी जे करत आहेत ते जबरदस्त आहे. 1.4 लाख कोटींच्या खर्चासहित ह्युस्टन येथे होणारा कार्यक्रम जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा कार्यक्रम आहे. पण कोणताही कार्यक्रम भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट लपवू शकत नाही, असं ट्वीट करत राहुल गांधींनी टीका केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या मोदींच्या कार्यक्रमावरुनसुद्धा टोला लगावला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या