नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कृषी विधेयकांविरोधात तीन दिवसांसाठी रॅली काढण्यात आली आहे. राहुल गांधी यांची रॅली काँग्रेसचं सरकार असणाऱ्या पंजाबमधून हरिणायात प्रवेश करत असतानाच ती पोलिसांनी अडवली.
राहुल गांधी यांनी आपल्याला पाच हजार तास वाट पहावी लागली तरी हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यानंतर एका तासातच हरियाणा सरकराने मोजक्या लोकांना रॅलीसाठी परवानगी दिली.
आम्हाला त्यांनी हरियाणा सीमेवर थांबवलं. जोपर्यंत पुढे जाण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत हटणार नाही. जर यासाठी दोन तास लागले तरी चालतीतल. 6, 10, 24, 100, 200, 500 कितीही तास लागू देत नाही. मी अजिबात हलणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
हाथरस पुन्हा हादरलं; 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?- किरीट सोमय्या
‘बिचारी गरीब.. ती ज्या कामात उत्कृष्ट आहे तेच काम… ‘; शबाना आझमींचा कंगणाला टोला