देश

“मोदींनी देशातील विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवावी”

नवी दिल्ली | विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा आक्रोश योग्य असून, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना सामोरे जात नाहीत. हिंमत असेल तर मोदींनी देशातील विद्यापीठांना भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांना सामोरं जावं, असं आव्हान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी  दिलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था का गडगडली? बेरोजगारी का वाढली? शेतकरी का आत्महत्या करत आहेत? अशा लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत. या देशाला मोदी कुठे घेऊन जाणार आहेत, हे सांगण्याची हिंमत पंतप्रधानांनी दाखवावी, असं राहुल गांधी म्हणाले.

तरुणांमधील खदखद जाणून घेण्याचा प्रयत्न न करता नरेंद्र मोदी देशात फूट पाडणारी धोरणं राबवत आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या विद्रोहाला पाठिंबा मिळाला. लोकांच्या मनात का राग आहे, हे समजून घेण्याऐवजी मोदी सरकारने दडपशाही सुरू केली आहे. जामियामध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली, असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या