देश

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

Photo Credit- Rahul Gandhi Twitter

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शांत, संयमी आंदोलनाने अचानक उग्र रुप धारण केलं आहे. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला आहे.

आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी  शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”

दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले

“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या