बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी भ्रष्ट नाही त्यामुळे भाजपवाले माझ्यावर 24 तास टीका करतात”

नवी दिल्ली | सध्या देशातील पाच राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लावल्या आहेत तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातातसुद्धा निवडणुक जाहीर झाली आहे. राष्ट्रीय पक्ष आपली पुर्ण ताकद लावत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूमध्ये बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. थुथुकुडीमधील सभेत बोलताना करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील हे चीनला माहिती होतं. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजप आणि संघाने देशातील विविध संस्था आणि फ्री प्रेसवर पद्धतशीरपणे हल्ला केला. तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजप दिवसाचे 24 तास माझ्यावर टीका करत असतात, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

देशातील लोकशाही ही एका फटक्यात नष्ट होणार नाही. तर ती हळूहळू संपुष्टात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध संस्थामधील संपुष्टात आणलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी महिलांच्या आरक्षणाबाबतही भूमिका मांडली. न्यायपालिका आणि संसदेमध्ये महिलांना आरक्षण मिळावं असं माझं मत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. यावेळी गांधींनी रिलायन्स आणि अदानीवरूनही मोदींना टार्गेट केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपयुक्त आहेत की व्यर्थ आहेत. पण मोदी हे दोन व्यक्तींसाठी खूप उपयुक्त आहेत. हम दो हमारे दो,  लोक पंतप्रधानांचा वापर आपली संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपयुक्त आहेत आणि गरीबांसाठी निरुपयोगी  असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पोलीसच निघाला चोर; माॅलमधून एकावर एक 3 शर्ट घालून पळत होता, तेवढ्यात…

खाकीतील सौंदर्य आणखीनच खुललं; PSI पल्लवी जाधव यांच्या डोक्यावर Miss Indiaचा ताज!

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच”

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?- चित्रा वाघ

‘चित्रा वाघ एवढा आकांड तांडव का करतीये?’; माजी IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More