दिल्ली| काँग्रेसला धक्का देत ज्योतिरादित्य शिंदे यांनी औपचारिकरित्या भाजपमध्ये आज प्रवेश केला आहेे. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या प्रवेशानंतर काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती परंतु आता राहूल गांधींनी मौन सोडलं आहे.
तुम्ही ज्योतिरादित्य यांना भेटणार नाही का, या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले, आम्ही चांगले मित्र आहोत ज्योतिरादित्य आणि मी एकाच कँपसमध्ये शिकत होतो. माझ्या घरी कोणत्याही क्षणी येऊ शकतो असा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे ज्योतिरादित्य, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
दरम्यान, दुर्दैव आहे की आम्ही ज्योतिरादित्य शिंदेेंसारखा नेता आज पक्षातून गमावला आहे, असं ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
ट्रेंडींग बातम्या-
#Corona | कोरोना व्हायरसचा पहिला बळी
अबब! कोरोनाचा चिंचवडमध्ये शिरकाव… आढळली एक संशयित महिला
महत्वाच्या बातम्या-
“कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली; राहुल गांधींचं हे मोठं अपयश”
“एकटे ज्योतिरादित्य शिंदेच जबाबदार का?, आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज”
Comments are closed.