Top News देश

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशावर नियंत्रण ठेवणारी आरएसएस ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही, असं म्हणत काँग्रेस गांधींनी आरएसएसवर टीकास्त्र सोडलं आहे.

तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करताना राहुल गांधी कोईंबत्तूरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली आहे.

महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. मात्र आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता, असं गांधी म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी एक एक करून देशातील जनतेशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू विकत आहेत. मोदींनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि जनतेच्या मालकीचं सर्व काही विकत आहेत, असा आरोपही गांधींनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला आहे- सुशीलकुमार शिंदे

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते”

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या