नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील नवीन अर्थसंकल्प अर्थंमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडला आहे. यावर काँग्रस नेते राहुल गांधी जोरदार टीका केली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद नाही. बेरोजगारीच्या मुद्यावर कुठलाच उपाय नाही. या अर्थसंकल्पनेनं कररचनेला आणखी क्लिष्ट केलं आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत गुंतागुंतीचा आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना अडीच तासांचं लांबलचक भाषण केलं. यामध्ये मला महत्त्वाचं असं काहीच वाटलं नाही. इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प होता, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये ठोस काही नाही. नवी बाटली जुनी दारू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं”
शहापूरच्या आदिवासी पाड्यातील झोपडीत शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद!
महत्वाच्या बातम्या-
आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात आहेत ‘या’ मोठ्या घोषणा!
आता मोबाईलसारखं वीजेसाठीही आधीच रिचार्ज करावं लागणार!
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची नांदी
Comments are closed.