मला तुमची मन की बात ऐकायची आहे- राहुल गांधी

दुबई | मला तुमची मन की बात ऐकायची आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी दुबईतील भारतीय कामगारांशी संवाद साधला आहे. राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत.

भारताचं नाव जगात तुमच्यामुळं मोठं होतं आहे. तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, यामुळं मला तुमच्या अडचणी ऐकायच्या आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यासोबत केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा देखील दुबई दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी आज रात्री अबुधाबी स्टेडियमवर अनिवासी भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-माझ्या मागे ‘शनी’ लागलाय आणि कोणता ‘शनी’ हे पण मला माहिती आहे-एकनाथ खडसे

-5 फुटांची गाय गाभण राहिल्यास तिला 15 फुटांचं रेडकू होईल का?- छगन भुजबळ

-…म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात आणलं पुणेरी पगडी घातलेलं गाढव!

-मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय, लोकसभा निवडणूक लढवणार नाही! 

-विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीची वाद चिघळला, 4 विद्यार्थी ताब्यात