बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान झाल्यावर मी सर्वात पहिले ‘हे’ काम करणार- राहुल गांधी

चेन्नई | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी यंदाची दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत साजरी केली. यावेळी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी कोणतं काम कराल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तर क्षणाचाही विलंब न करता राहुल गांधी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

राहुल गांधींनी त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. त्यांच्या संभाषणादरम्यान एकाने त्यांना विचारलं की, तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी कोणतं काम कराल तर यावर मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी महिलांना आरक्षण देईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

तर राहुल गांधी पुढे म्हणाले की, जर कोणी मला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवण द्याल तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते. राहुल गांधींनी त्यांच्या दिवाळी जेवणाच्या वेळेचे काही क्षण ट्विट करत शेअर केले आहेत.

मित्रांच्या या भेटीने दिवाळी आणखीनच खास झाली, असं लिहित राहुल गांधींनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर राहुल गांधीनीं पुढे लिहिलं की, संस्कृतींचा हा संगमच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि आपण ती जपली पाहिजे. तर या दिवाळी कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या शेतकरी आंदोलनातील सहभागाचं देखील कौतुक झालं.

थोडक्यात बातम्या-

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही मागे टाकलं

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

“नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More