Top News देश राजकारण शिक्षण

नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींची आज ट्रॅक्टर रॅली!

Photo Courtesy- Facebook/Rahul Gandhi

तिरूअनंतपूरम | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला आता 90 दिवस पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात ट्रॅक्टर रॅली होणार आहे.

दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. तसेच ते अनेक ठिकाणी उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. ट्रॅक्टर रॅलीनंतर राहुल गांधी शेतकरी आंदोलकांना संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना राहुल यांनी फक्त मोठ्या उद्योजकांना यातुन फायदा होणार असल्याची टीका केली आहे.

शेतकरी आणि जवान यांच्या हातावर तूरी देण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. बड्या उद्योगपतींचा फायदा लक्षात घेउन हे बजेट सादर करण्यात आलं असून जवानांच्या पेन्शनमध्येही कपात करण्यात आल्याचा घणाघातही यावेळी राहुल गांधींनी केला.

दरम्यान, तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, कोणत्याही शेतकऱ्याला ते बंधनकारक नसल्यामुळे त्याला विरोध होण्याचं काहीही कारण नसल्याचं पंतप्रधानांनी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!

मुंबई महापालिका निवडणूकीसदंर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या