मोदीजी, एक पत्रकार परिषद घेऊन दाखवा; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान

मोदीजी, एक पत्रकार परिषद घेऊन दाखवा; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान

नवी दिल्ली | राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदीजी, एक पत्रकार परिषद घेऊन दाखवा, असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे. 

निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही तुमच्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल,अशी आशा आहे, असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

पंतप्रधानपदी विराजमान होऊन १६५४ दिवस झाले, अजून एकही पत्रकार परिषद घेतली नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

आमच्या हैदराबादच्या पत्रकार परिषदेची ही काही क्षणचित्रं पाहा. एखाद्या दिवशी अशी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्नांचा सामना तर करुन पाहा, असं राहुल गांधी यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चारा नसेल तर तुमची जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा; राम शिंदेंचा संतापजनक सल्ला  

-५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही- अमित शहा  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?  

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

Google+ Linkedin