“स्मृती इराणी यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं बंद करा”; राहुल गांधींनी ट्वीट करत केलं आवाहन

Rahul Gandhi | कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता.अमेठी येथून त्या विजयी झाल्या होत्या. मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी यांना महिला आणि बालविकास खात्याचे मंत्रिपद देण्यात आले होते. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेसाठी देखील त्यांना अमेठीमधून भाजपाने तिकीट दिलं होतं.

या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी दारुण पराभव केला आहे. दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने स्मृती इराणी यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवानंतर कॉँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रचंड टीका केली होती.

स्मृती इराणी सोशल मीडियावर ट्रोल

इतकंच नाही तर, सोशल मीडियावर देखील स्मृती इराणी यांना ट्रोल करण्यात आलं होतं. स्मृती इराणी यांनी निवडणुकीपुर्वी मासिक पाळीसंदर्भात एक विधान केलं होतं. यानंतरही त्या खूप ट्रोल झाल्या होत्या. लोकसभेत जेव्हा त्यांचा पराभव झाला, तेव्हा सोशल मीडियावर हा मुद्दाही खूप चर्चिला गेला होता.

अशात राहुल गांधी (Rahul Gandhi) हे स्मृती इराणी यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी एक ट्वीट करत स्मृती इराणी यांची बाजू घेतली आहे.  गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यामधील वातावरण जोरदार तापले होते.  राहुल गांधी यांनी  अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याची घोषणा केली होती, तेव्हा स्मृती इराणी यांनी राहुल गांधी घाबरून दुसऱ्या मतदारसंघात गेले, असं  म्हणाल्या होत्या.

राहुल गांधी यांनी केलं आवाहन

मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. पराभव झाल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे त्यांचा बंगला रिकामा करावा लागला. दिल्लीतील लुटियन्स भागातील 28, तुघलक क्रिसेंट येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. आता हा बंगला खाली करायला लागल्यानेही त्यांना ट्रोल करण्यात आलं.

स्मृती इराणी यांच्यावर होत असलेल्या या टीकेवरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. “, राजकारणात जय, पराजय होत असतो. पण, एखाद्याचा अपमान करणे हे दुर्बलांचे लक्षण आहे. मी सर्वांना विनंती करतो की, स्मृती इराणी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे टाळावे.लोकांना अपमानित करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे.”, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले आहेत. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेत आलं आहे.

News Title –  Rahul Gandhi tweet on Smriti Irani

महत्त्वाच्या बातम्या-

सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण

प्री-वेडिंगवरच हजार कोटी उडवले, लग्नासाठी तर तब्बल..; अंबानींच्या लग्नातील खर्चाचा आकडा समोर

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?

अजित पवार गटातील नेत्याकडून अनिल परब यांचं कौतुक!

आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; 10 ग्रॅमसाठी आता..