बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून किती दिवस माफी मागणार?”

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांची माफी मागितली होती. यावरून विरोधकांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींना काही सवाल विचारले आहे.

राहूल गांधी यांनी ट्विट करून, “आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणं, नोकरी न देणं, अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांविरोधातील पोलीस खटले मागे न घेणं, या बऱ्याच मोठ्या चुका आहेत. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा माफी मागणार,” असा सवाल विचारून त्यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभेतही हाच मुद्दा मांडल्याचं पाहायला मिळालं, सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना नुकसानभरपाई द्यावी. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात जवळपास 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या कुटूंबियांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी राहूल गांधीनी केली आहे.

दरम्यान, राहूल गांधी याांनी याआधीही ही मागणी केली होती. मात्र, यावर कृषी मंत्र्यानी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारीच नसल्याने नुकसान भरपाई कशी देणारं, असं सांगितलं होतं. त्यावर राहूल गांधीनी आमच्याकडे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी आहे, आणि तुमच सरकार म्हणतं आमच्याकडे यादी नाही, असं उत्तर दिलं होतं.

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More