Top News देश

सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपने केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा सफाया केला. यानंतर भाजपने विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

एलपीजी सिलेंडरच्या दरात 150 रुपयांची वाढ केल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या या सदस्यांसोबत मी सहमत आहे, असं म्हणत गांधी यांनी स्मृती इराणींचा सिेलेंडर घेऊन आंदोलन करत असतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

यूपीए सरकारच्या कार्यकाळात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी भाजपने जोरदार आंदोलन केलं होतं. स्मृती इराणी गॅस सिलेंडर घेऊन भाजप कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. तेंव्हाचा हा स्मृती इराणी यांचा फोटो आहे.

दरम्यान, इंडियन ऑईलने गॅस सिलेंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही- संभाजी राजे

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

शरद पवार आणि शिवसेनेनं भाजपला खिजवण्याचं काम करू नये- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या