राहुल गांधींना होणाऱ्या बायकोत ‘हे’ 2 गुण हवेत!

नवी दिल्ली | सध्या काँग्रेस नेते राहुल गांधींची सगळीकडे चर्चा सुरु आहे. भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे. यात्रेच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत आहेत. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या वाढलेल्या दाढीमुळे आणि त्याच्या लग्नाचा बाबतीत एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सध्या ते चर्चत आहेत.

सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधींनी एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लाईफ बद्दल काही खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी त्याच्या होणाऱ्या बायकोमध्ये कोणते गुण हवे आहेत याबद्दल खुलासा केला.

मी लग्नाचा विरोधात अजिबात नाही आहे. माझ्या आई-वडिलांचं लग्न खूप सुंदर होतं. त्यामुळे माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारी एखादी मुलगी भेटली की मी नक्की लग्न करेन, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांना त्यांची होणारी बायको काळजी करणारी आणि हुशार हवी आहे.

मी माझ्या आरोग्याबद्दल खूप दक्ष राहतो. मी घरात असतो तेव्हा स्ट्रिक्टली डायट पाळतो. मी गोड पदार्थांपासून नेहमीच लांब राहतो. मला आईस्क्रिम खायला खूप आवडतं. मला जेवणात फणस आणि मटर खायला अजिबात आवडत नाही असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

त्यांना सध्या त्यांचा दाढीवरुन ट्रोल केलं जातं आहे. तेव्हा राहुल गांधी म्हणाले यात्रेदरम्यान दाढी करणं मला योग्य वाटत नाही आहे. या दाढीमुळे मला नवीन लूक नक्कीच मिळाला आहे. जेवण करताना मात्र याचा त्रास होतो. राहुल गांधीची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या