पंतप्रधानपदाचा मान राखा, राहुल गांधींची कार्यकर्त्यांना सूचना

अहमदाबाद | नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टीका करा पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचाही मान राखायला हवा, अशी सूचना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीमला दिली.

गुजरात विधानसभा निवडणुकांचा सोशल मीडियावरही प्रचार वाढतोय. त्यामुळे बनासकांठी येथे राहुल गांधी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडिया टीम सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढल्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. त्यावेळी पंतप्रधानपदाचा मान राखायला हवा, अशी तंबी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिली.