बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा मुंबईत हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते”

नवी दिल्ली | वर्ष 2008 मुंबईतील दहशतवादी (Mummbai terrior Attack) हल्ल्यानं आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला हादरा दिला होता. दहशतवादी हल्ल्यानं सदा बहरलेली मुंबई एकदम थांबली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला तोंड देताना आपण आपले वीर गमावले होते. तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील (Home minister) आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Former CM Vilasrao Deshmukh) यांनी नैतीकता जपत राजीनामा दिला होता. अशातच आता भाजपकडून काॅंग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला होत होता तेव्हा काॅंग्रेस नेते राहुल गांधी पार्टी करण्यात व्यस्त होते, अशी जहरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अमित मालवीय यांनी केली आहे. मुंबईत जेव्हा हल्ला झाला तेव्हा केंद्रात आणि राज्यात काॅंग्रेस सत्तेत होती. केंद्रीय गृहमंत्रिपदी राज्याचे नेते सुशीलकुमार शिंदे हे होते. परिणामी भाजपकडून सातत्यानं काॅंग्रेसवर टीका करण्यात येते.

अमित मालवीय हे सध्या भाजप आयटी सेलचे प्रमुख आहेत. त्यांनी एका वर्तमानपत्राचा दाखला देत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सर्व देशाला माहिती आहे की, मुंबई हल्ल्यावेळी राहुल गांधी आपल्या मित्रांसमवेत पार्टी करण्यात व्यस्त होते, असं मालवीय म्हणाले आहेत. मालवीय यांच्या या टीकेनंतर काॅंग्रेसकडूनही प्रत्यूत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, आज मुंबई हल्ल्याला 13 वर्ष झाली आहेत. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा हल्ला म्हणून या पाकपुरस्कृत हल्ल्याला ओळखण्यात येतं. या हल्ल्यात 15 देशांच्या 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर प्राणपणाला लावणाऱ्या सुरक्षादलातील 18 जणांना विरमरण आलं होतं.

थोडक्यात बातम्या 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

अण्णा हजारे यांच्या तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंकडून खिल्ली, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात बदल दिसेल, भाजपचं सरकार येणार”

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची सर्वत्र दहशत, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More