बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण

नवी दिल्ली | काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे पक्षाला लोकसभेत तीन आकडी जागा देखील जिंकता आली नाही. त्यानंतर पक्ष पूर्णपणे पिछाडीवर राहिला. त्यानंतर खासदार राहुल गांधींनी पक्षाची धुरा संभाळली. पण त्यांच्याही पदरी निराशाच पडली. आता राहुल गांधी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागताना दिसत आहेत.

भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे. फक्त तरूणांवर लक्ष केंद्रीत करणं ही माझी चूक ठरली अशी कबूली राहुल गांधी यांनी दिली. राजकारणात विश्वास, निष्ठा आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्यावर या कार्यक्रमात राहुल यांनी भर दिल्याचं पहायला मिळालं.

महात्मा गांधी म्हटलं होतं की राजकारणाचा अर्थ विश्वास आहे आणि आज देशात तो विश्वास असणं आवश्यक आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहावं. जे लोक पक्षाशी मोठ्या काळापासून एकनिष्ठ आहेत त्यांना भविष्यात संधी दिली जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसमध्ये कुणालाही परतायचं असेल तर त्यासाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले असतील. काँग्रेस हा एक महासागर आहे. ज्याला पक्षात परत यायाचं आहे त्यानं यावं, असंही राहुल गांधी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

कंगाल पाकिस्तानला भारत देणार कोरोना लसीचे इतके कोटी डोस!

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More