नवी दिल्ली | पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आकलनशक्तीची मला कीव येते, असे विधान भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटवर या संदर्भात व्हीडिओ शेयर केला आहे.
राहुल गांधींनी बोलताना भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या दोन कंपन्यांच्या नावात गल्लत केली. त्यामुळे पात्रांनी त्यांच्यावर टीका केली.
दरम्यान, पंतप्रधान पदीची मनिषा बाळगणाऱ्या व्यक्तीची समज या स्तरावर आहे. हे खरंच एका परिपक्व राजकारण्याचे लक्षण आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पंढरपुरात 40 अज्ञात मराठा आंदोलकाविरोधात अॅट्रॉसिटी दाखल
-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी
-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी
-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण
-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!