बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींच्या कालच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची जोरदार टीका

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावर ‘मन की नही, स्टुडंट्स की बात करो’ असं म्हणत राहुल गांधी यांंनी मोदींवर टीका केली आहे.

‘बघा…यांची ‘मन की बात’ खेळण्यांवर’. ‘जेईई नीट परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षा पे चर्चा’ हवी आहे, ‘खिलोने पे चर्चा’ नकोय.’ रविवारी झालेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत मोदींवर टीका केली आहे.

जेईई आणि नीट या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी केली आहे. विद्यार्थांच्या या मागणीला राहुल गांधी तसेच संपुर्ण काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. ‘मन की बात’ला तोडीस तोड म्हणून राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ ही व्हिडियो सीरीज सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सिरीज सोशल मिडीयावरुन दाखवण्यात येणार आहे.

दरम्यान, विद्यार्थांचे वार्षिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी  केंद्र सरकारने जेईई, नीट परीक्षा ठरलेल्या वेळेत घेण्यात येणार असल्याचं सांगितलं असून, उद्यापासुन जेईई मेन ही एन्ट्रान्स परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानांच्या ‘या’ भाषणाने केला नवा विक्रम प्रस्थापित…!

सुशांत मृत्यु प्रकरणात ईडी आज करणार या महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी, जबाबाकडे लक्ष

‘भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी’, संजय राऊतांची टीका

आता खड्ड्यांसोबत फोटो का नाही?, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल

चिंताजनक! राज्यात आज 16,408 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More