बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या मैदानात राहुल गांधींची किक! गोव्यातील जनतेला दिलं ‘हे’ वचन

मुंबई | गोव्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष आता गोव्यात तळ ठोकून बसलेले दिसत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एकदिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तळेगाव स्टेडियमवर राहुल गांधी यांचं वेगळेच रूप पहायला मिळालं.

तळेगाव स्टेडियमवर राहुल गांधी हातात फुटबाॅल घेऊन आल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहुल गांधी फुटबॉल खेळताना दिसले. स्टेजवरूनच त्याने फुटबॉलला अशा प्रकारे किक मारली की चेंडू स्टेडियममध्ये बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचं टाळ्या वाजवून स्वागत देखील केलं आहे.

काँग्रेसने पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने ही केवळ वचनबद्धता नसून एक प्रकारची हमी आहे, असं गोव्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेची माहिती देताना पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपच्या विचारसरणीविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे मला अभिनंदन करायचे आहे. मला काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि गोव्यातील जनतेला वचन द्यायचंय की पक्षांतर करणाऱ्यांना पक्षात स्थान मिळणार नसल्याचं देखील राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

न्यूझीलंडविरूद्ध हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; विराट कोहली म्हणतो…

‘केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करणं…’; विराटचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More