Top News

राहुल गांधींची उद्या मुंबईत जाहीर सभा, सध्याच्या परिस्थितीवर काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

मुंबई | उद्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईमध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी ते मुंबईसह महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात संबोधित करणार आहेत.

सद्य स्थितीत देशाची एकंदरित परिस्थिती पाहता राहुल गांधी उद्या काय बोलणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचं आणि भारत सरकारचं कौतुक राहुल गांधींनी केलं आहे.

मात्र हल्ल्याचा संबंध थेट भारतामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीशी आहे. मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांची इच्छा आहे, असा खळबळजनक दावा दक्षिण आशियासंबंधीच्या सुरक्षा विशेषतज्ञ प्रोफेसर क्रिस्टीन फायर यांनी केला आहे.

देशात सद्यस्थितीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना आता राहुल गांधी काय भूमिका घेणार? क्रिस्टीन फायर यांचाच मुद्दा अधोरेकित करून मोदींवर हल्लाबोल करणार का?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या