बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. देशभरातून मोदी सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी त्यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट करून ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की “देशातील बळीराजाने आंदोलन करून गर्वाची मान खाली झुकवली आहे. अन्यायाविरोधात मिळालेल्या या विजयाबद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. याचबरोबर त्यांनी या ट्विटच्या शेवटी “जय हिंद, जय हिंद का किसान” असंही म्हटलं आहे.

या ट्विटसोबत राहूल गांधीनी शेअर केलेला व्हिडीओ जानेवारी महिन्यातील आहे. यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी या व्हिडीओसोबत माझे शब्द लिहून घ्या, “सरकारला एक दिवस हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील,” असं कॅप्शन दिलं होतं. राहुल गांधीनी हाच  व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाने देशातील शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून 3 कृषी कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

‘आम्हीच कमी पडलो’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशाची माफी

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More