नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्कातून काँग्रेस अजून सावरलेली दिसत नाहीये. पक्षाचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी जबाबदारी घेत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस वर्किंग कमिटीकडे दिला. आणि आता तर त्यांनी लोकसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदाची जबाबदारी घेणेही टाळलं आहे.
राहुल गांधींनी गटनेतेपदाची जबाबदारी टाळल्याने पश्चिम बंगालचे अधीर रंजन चौधरी यांची लोकसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर किमान सभागृहात तरी पक्षाचं नेतृत्व करावं, अशी पक्षातल्या नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र त्यांनी आपला नकार कायम ठेवला आहे.
दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांची ही लोकसभेतील पाचवी टर्म आहे. त्यांना देखील संसदीय कामाचा दांडगा अनुभव आहे.
महत्वाच्या बातम्या
-वंदे मातरम इस्लामविरोधी आहे, आम्ही म्हणणार नाही- सपा खासदार
-निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन
-स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारची मोठी घोषणा
-अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर
-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार
Comments are closed.