बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत’; प्रियांका गांधींसाठी राहुल गांधींचं ट्विट

लखनऊ | अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अशात युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रात्री उशिरा प्रियांका लखनऊला पोहोचल्या. तिथून त्या लखीमपूरला पावसात रवाना झाल्या. आज पहाटे 5.30 च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं आहे. प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींसाठी एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितलं आहे. प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू, असं देखील राहुल गांधींनी म्हणाले आहेत.

प्रियांका गांधींना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितलं आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?”

आर्यन खानसह हायप्रोफाईल केसेस लढवणारे सतीश मानशिंदे एका दिवसासाठी आकारतात ‘इतके’ लाख

“मोठ्याचा मुलगा असो किंवा कोणत्या नेत्याचा सर्वासाठी कायदा हा समानच आहे”

सलग 4 दिवसांच्या दरवाढीनंतर आता इंधन दरवाढीला ब्रेक; पाहा आजचे दर

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसं उत्तर द्या- मनोहरलाल खट्टर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More