बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पबमध्ये मैत्रिणीसोबत दिसले राहुल गांधी, भाजप नेत्याकडून व्हिडीओ शेअर

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळमध्ये आहेत. राहुल गांधी त्यांच्या खासगी दौऱ्यावर असून त्यांचा या दरम्यानचा एक व्हिडीओ भाजप (BJP) नेत्याकडून शेअर करण्यात आला आहे.

राहुल गांधी एका लग्नासाठी नेपाळला गेले असून काठमांडूच्या मॅरिएट हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळेसचा राहुल गांधींचा तेथील एका प्रसिद्ध पबमधील पार्टीतील व्हिडीओ समोर येत आहे. भाजप नेत्यांकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावरून राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत.

जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हाही राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. आता जेव्हा त्यांचा पक्ष संकटात आहे तेव्हाही ते नाईट क्लबमध्ये आहेत, अशी टीका करत भाजपच्या सोशल मीडिया चे इन्चार्ज अमित मालविया (Amit Malviya) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी हे नेपाळमधील ‘लॉर्ड्स ऑफ द ड्रिंक’ येथे असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप नेत्यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसला घेरण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र, राहुल गांधी किंवा काँग्रेस कोणाकडूनही अद्याप या व्हिडीओवर प्रतिक्रिया आलेली नाही.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“घरात बसून बोलायला काय जातं, गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतील”

“बाबरीवेळी मोदी, शहा कुठे लपून बसले होते, फडणवीस तर पळताना दिसत होते”

“लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेला होता”

शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे तर मानसिकता महत्वाची – प्रविण पाटील

“निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More