बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्लास राहुल! विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकत बनला हीरो

मुंबई | आयपीलमधील पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुलने आजच्या हैदराबादविरूद्धच्या सामन्यात केवळ 4 धावा केल्या. मात्र या 4 धावा करत राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकत आपल्या नावे नवीन विक्रम केला आहे.

राहुलने टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय म्हणून वेगवान 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने टी-20 क्रिकेटच्या 143 डावांमध्ये 5003 धावा केल्या आहेत. यावेळी, त्याची सरासरी 42 तर त्याचा स्ट्राइक रेट 138 आहे. लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 4 शतके आणि 41 अर्धशतके केली आहेत.

टी-20 मध्ये सर्वात वेगवान 5000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी 132 डावात केली आहे. राहुलने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले. मार्शने ही कामगिरी 144 डावात केली आहे.

दरम्यान,  पंजाब किंग्जने 20 ओव्हरमध्ये 10 विकेट गमावून 120 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने 21 धावा देऊन तीन गडी बाद केले. पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि शाहरुख खानने 22-22 धावा केल्या. हे लक्ष्य पुर्ण करताना फक्त 1 विकेट गमवून हा सामना जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो याने नाबाद 63 रन केले. डेविड वॉर्नर याने 37 धावा केल्या. केन विलियम्सनने नाबाद 16 धावा केल्या.

थोडक्यात बातम्या- 

पुण्याचं नाशिक होऊ देऊ नका- महापौर मुरलीधर मोहोळ

मुख्यमंत्र्यांचा ॲानलाईन संवाद रद्द, संपूर्ण लॅाकडाऊनसंदर्भात नवी माहिती आली समोर

“दिल्ली मरतेय, थोडीतरी लाज असेल तर राजीनामा द्या”

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More