कलाटे ऐकायलाच तयार नाहीत; आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मविआचे बंडखोर उमेदवार(Chinchwad Bypoll Election) राहुल कलाटे (Rahul kalate) यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. शिवाय त्यांना भाजपची फूस आहे असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कलाटेंना फोन करून अर्ज मागे घेण्यास सांगितलं मात्र तरीही कलाटेंनी आपला उमेदवारी मागे घेतली नाही.

कलाटेंनी उद्धव ठाकरेंचं न ऐकता थेट त्यांनाच आव्हान दिल्याचं कळतंय. कलाटे यांनी बंडखोरी केल्याने आता शिवसेनेकडून (Shivsena Mla त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कलाटे यांनीही माझ्यावर काय कारवाई होतेय हे पाहायचं असं म्हणून अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वालाच म्हणजे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

मी 2019 मध्ये ही विधानसभा निवडणूक लढलो. तेव्हाही शिवसेनेकडून कारवाई होईल, असं बोललं जात होतं. मात्र नेत्यांनाही लक्षात येत असेल की माझ्यावर अन्याय होतोय. ही भावना तेव्हा ही जाणवली होती, त्यामुळेच तेव्हाही माझ्यावर कारवाई झाली नव्हती. पण आता काय कारवाई होतेय याकडे मीही लक्ष देतोय, असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी अजित पवारांकडे आणि महाविकास आघाडीकडेच उमेदवारी मागत होते. मी दुसऱ्या कोणत्यात नेत्याला कधीच भेटायला गेलो नाही, असंही राहुल कलाटेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-