उद्या मोठी घडामोड घडणार; महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?

Maharashtra

Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल 231 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला सर्व मिळून 50 जागा जिंकता आल्या आहेत. तसेच त्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील झाला आहे. अशातच आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनात अनेक आमदारांच्या शपथविधी झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण अर्ज करणार? :

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजप पक्षाकडून निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजप पक्षाचाच होणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे दिग्गज नेते राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra l उद्याचा दिवस महत्वाचा :

राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी देखील इच्छूक होते. कारण महायुतीमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी नार्वेकर यांना अपेक्षा होती. त्यामुळे आता ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title –Rahul Narvekar is likely to apply once again for the post of Assembly Speaker

महत्त्वाच्या बातम्या-

राजकीय महाभूकंप… महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला

…म्हणून मविआच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं?

बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई

थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .