मोदी आणि संघाला देशावर विचारधारा थोपवू देणार नाही!

चेन्नई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाला त्यांची विचारधारा देशावर थोपवू देणार नाही, असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. डीएमके प्रमुख करुणानिधी यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.

संघ आणि नरेंद्र मोदी हास्यास्पद विचारांचा प्रसार करत आहेत. मात्र आम्ही ते मूकपणे पाहणार नाही, आम्ही त्यांना जोरदार विरोध करु, असं राहुल गांधी म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपविरोधी पक्षातील दिग्गजांनी हजेरी लावली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा