बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले, म्हणाले मलाही युती करायचीये”

नवी दिल्ली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांसह दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत आपला वेगळा गट स्थापन करण्याची मागणी केलीय, अशी माहिती यावेळी शिंदेंनी दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाली होती, असं राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी युतीसाठी प्रयत्न झाले पण भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याने ती गोष्ट तेव्हा घडू शकली नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. माझ्या परिने मी युतीचे सर्व प्रयत्न केले. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

दरम्यान, युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली, जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजप नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजप श्रेष्ठीत नाराजी पसरली, असं शेवाळेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”

‘त्या’ भेटीचा उल्लेख करत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले…

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More