नवी दिल्ली | शिंदे गटाच्या लोकसभेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांची निवड करण्यात आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी दिल्लीत 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली.
एकनाथ शिंदेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. राहुल शेवाळे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती, असं राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचं सूतोवाच केलं होतं, असंही राहुल शेवाळेंनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले…
…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”
“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”
Comments are closed.