Top News खेळ

तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

दुबई | राजस्थान रॉयल्सचा विजयरथ पुन्हा एकदा पटरीवर आला आहे. दुबईत झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सनं सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी शेवटच्या काही चेंडूंमध्ये हा सामना राजस्थानच्या बाजूनं फिरवला.

राहुल तेवतियाने २८ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या तर रियान परागने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. २ चेंडूत २ धावा गरजेच्या असताना रियान परागने षटकार मारुन राजस्थानला सामना जिंकून दिला. मात्र यावेळी मैदानावर अशी गोष्ट झाली जिची सोशल मीडियात एकच चर्चा सुरु आहे.

२ चेंडूत २ धावांची गरज असताना राजस्थानचा गोलंदाज खलील अहमद आणि राहुल तेवतिया यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतरच्या चेंडूवर रियान परागने विजयी षटकार ठोकला आणि विजयाच्या आनंदात भर मैदानात डान्स केला. याला सनरायझर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने आक्षेप घेतला, यावरुन वॉर्नर आणि तेवतिया यांच्यातही शाब्दिक खटके उडालेले पहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ-

या घटनेनंतर तेवतिया सोशल मीडियात ट्रेंड करतोय-

 

महत्त्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”

…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे

चीनच्या पाठिंब्याने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु- फारुख अब्दुल्ला

आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे- उद्धव ठाकरे

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या