बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | इंडियन प्रीमीयर लीग 2021 स्पर्धा आता तोंडावर येऊन ठेपली आहे. 9 एप्रिलपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने ‘आयपीएल’च्या या 14व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांचे खेळाडूला तयारीला लागले आहेत. अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. तर काही खेळाडू सध्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतियाचा फलंदाजी सरावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तेवतियाने नुकताच त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून आता त्याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याच्या सरावाचा व्हिडीओ  राजस्थान रॉयल्सने ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की ‘राहुल तेवतिया आला आहे. विकेटच्या सुरुवातीसाठी हे कसे आहे.’ असं कॅप्शन दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये तेवतिया नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाही दिसत आहे. तसेच तो स्विप हिट या शॉटचाही सराव करताना दिसत आहे. याशिवाय काही मोठे फटकेही मारताना देखील दिसत आहे. तसेच तो धावन्याचा सराव देखील करत आहे.

दरम्यान, तेवतिया ‘आयपीएल’ 2020 च्या हंगामादरम्यान फाॅर्ममध्ये आला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 31 चेंडूत नाबाद 53 धावा ठोकल्या होत्या. यातील 30 धावा त्याने एकाच षटकात 5 षटकार मारत काढल्या होत्या. त्यानंतर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. तसेच त्याने त्या हंगामात चांगली कामगिरी करताना 14 सामन्यात 255 धावा आणि 10 विकेट्स घेतल्या होत्या.

Shree

थोडक्यात बातम्या – 

मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक, लॅाकडाऊनबद्दल होऊ शकतो ‘हा’ मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भयाण वास्तव, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला माणसं मिळेना!

बॉलिवूडला मोठा धक्का; ‘या’ एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शकाचं निधन!

एप्रिल-मे मध्ये होईल कोरोना कहर; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे धक्कादायक निष्कर्ष!

“महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये मात्र थाळ्या पिटल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More