बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

मुंबई | सध्या राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची बरीच चर्चा होताना दिसतीये. 16 जुलै रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असून त्यांच्या लग्न विधींना सुरुवात झालेली आहे. बुधवारी राहुल आणि दिशाचा मेहंदी समारंभ पार पडला. मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तसेच मेहंदी नंतर आज पार पडलेल्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या समारंभात दोघेही अत्यंत आनंदी आहे, हे त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटो मधून स्पष्टपणे दिसून येत आहे. या फोटोमध्ये दिशा अत्यंत सुंदर दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by DP (@dishaparmar)

दिशाच्या चेहऱ्यासह, हातावर आणि पायावर हळद लागलेली दिसून येतेय. या फोटोमध्येे दिशा गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये माखलेली आहे. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीसुद्धा लग्नाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. हळद समारंभानंतर राहुल आणि दिशा यांनी संगीत समारंभाचं देखील आयोजन केलं आहे. या क्षणासाठी राहुल आणि दिशा अनेक दिवसांपासून तयारी करत होते

 

दरम्यान, दिशा आणि राहुलच्या या फोटोंवर चाहते चांगलाच प्रेमाचा वर्षाव करत आहे. तसेच चाहते दिशा आणि राहुलला पारंपारिक वधु-वराच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

‘वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले’; पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More