राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी

नवी दिल्ली | राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भाजप खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली आहे.

राफेल विमान खरेदीकरार करताना तो विमानांच्या किमतीपेक्षा तिप्पट रकमेचा केला गेला, असा काँग्रेसचा आरोप होता. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीला कंत्राट न देता ते अनिल अंबानी यांच्या कंपनीला का दिले गेले, असा प्रश्न काँग्रेस नेते विचारत होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांंनी राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल केली आहे, त्यांनी लोकसभेची आणि देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तीन राज्यांच्या पराभवानंतर बॅकफूट वर गेलेले भाजप नेते काँग्रेस विरोधात आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….

-राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. गो. वैद्य

-मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी

-मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप खासदार गैरहजर