बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुलचा धमाका, रोहितची तुफान खेळी; ऑस्ट्रेलियावर भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय

मुंबई | विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियावर देखील एकहाती विजय मिळवला. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भारताचा सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याआधी  या दोन्ही संघावर विजय मिळवत भारताने ट्रेलर दाखवून दिला आहे. बुधवारी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 152 धावांचं लक्ष्य भारताने 9 गडी राखून पूर्ण केलं. त्यामुळे टी-20 विश्वचषक 2021 जिकंण्याच्या आशा आता भारतीय चाहत्यांना लागून राहिलेल्या दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाचे सुरूवातीचे 3 फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे संघाला तारत स्टिव्ह स्मिथने 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने ताबोडतोब 37 धावांची खेळी साकारत संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. सरतेशेवटी स्टाईनिसने 25 चेंडूत 41 धावांची वेगवान खेळी साकारली आणि संघाला 152 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून फिरकीपटू अश्विने सर्वाधिक 2 बळी टिपत 2 षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले 153 धावांच लक्ष्य भारताच्या फलंदाजांने सहज पार केलं. भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 68 धावांची भागिदारी रचली. यामध्ये के. एल. राहुलने 2 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकाराच्या साहाय्याने 39 धावांची उपयुक्त खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एश्टन अगरने फेकलेल्या चेंडूवर डेव्हिड वार्नरने झेल घेतला आणि राहुल झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने 60 धावांवर डाव सोडला. आणि त्यानंतर सुर्याकुमारने आपल्या हातात डाव घेतला.

दरम्यान, इंग्लड विरूद्ध सराव सामन्यात छाप सोडण्यात अपयशी ठरलेल्या सुर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया विरूद्ध विजयी खेळी साकारली. त्याच्या 38 धावांच्या खेळीत 1 षटकार आणि 5 खणखणीत चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला हार्दिक पांडयाने टोलवलेला चेंडू सीमा पार गेला आणि भारत विजयी घोषित झाला.

थोडक्यात बातम्या-

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More